Thu. Jun 20th, 2019

प्रेयसीचे दुसऱ्यासोबत प्रेमसंबंधच्या संशयावरून प्रियकराने केली हत्या

0Shares

प्रेयसीचे दुसऱ्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून प्रियकराने धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील चंदन नगर परिसरात घडली आहे. मंगळवारी रात्री प्रियकराने प्रेयसीला भेटण्यासाठी बोलावले होते. या दोघांमध्ये मोठा वाद झाल्याने हत्या केल्याचे समजते आहे. तरूणीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर तिला मृत घोषित केले.

नेमकं काय घडलं ?

पुणे येथील चंदन नगर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे.

प्रेयसीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये वाद झाला होता.

प्रियकराने प्रेयसीला भेटण्यासाठी बाहेर बोलावले.

मात्र वाद थांबत नसल्यामुळे प्रियकराने रागाच्या भरात धारदार शस्त्राने हत्या केली.

मीना पटले (23) असे मृत तरूणीचे नाव असून किरण शिंदे (25) आरोपीचे नाव आहे.

किरण हा सॉफ्टेवअर इंजिनियरींगच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी असून हिंजेवडीतील IT कंपनीत काम करत होता.

तर मीना पुण्यात नर्सिंगचे शिक्षण घेत होती.

त्याचबरोबर ती एका कॉल सेंटरमध्येही काम करत होती.

गेल्या एक वर्षापासून मीना आणि किरण रिलेशनमध्ये होते.

यामधून वाद निर्माण झाल्याचे समजते आहे.

 

 

 

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: