Thu. Jun 20th, 2019

प्रेयसीला मृत दाखवण्यासाठी प्रियकराने वेश्येच्या केली हत्या

0Shares

औरंगाबादमध्ये प्रेयसीसोबत राहण्यासाठी एका युवकाने चक्क वेश्येची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीच्या कुटुंबियांना ती मृत असल्याचे भासवण्यासाठी प्रियकराने वेश्येचा चेहरा जाळून हत्या केल्याचे समजते आहे. चिखलठाणा पोलिसांनी दोघेही आरोपींना चाळीसगाव येथून अटक केले आहे.

नेमकं काय घडलं ?

विवाहीत प्रेयसीसोबत राहण्यासाठी प्रियकराने एका वेश्याची हत्या केल्याचे समजते आहे.

क्राईम पेट्रोल बघून ही हत्या केल्याचे प्रियकर आरोपीने सांगितले आहे.

छबीदास असे आरोपी प्रियकराचे नाव असून सोनाली शिंदे असे आरोपी विवाहीत प्रेयसीचे नाव आहे.

छबीदास आणि सोनालीचे अनैतिक संबंध असल्याचे समोर आले आहे.

सोनालीसोबत राहण्यासाठी छबीदासने वेश्याची हत्या केली.

25 मे रोजी पिसादेवी शिवरात या वेश्याचा मृतदेह पोलिसांना अढळला.

पोलिसांनी शोध घेतल्यानंतर सोनाली शिंदे गायब असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी सोनालीच्या भावाला बोलवून मृतदेहाची ओळख पटवण्यास सांगितले.

त्यावेळी भावाने सोनालीचाच मृतदेह असल्याचे त्याने सांगितले.

तसेच सोनालीच्या पतीनेच तिची हत्या केल्याची आरोप भावाने लावला.

मात्र पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर ही सर्व घटना समोर आली.

छबीदास आणि सोनाली लग्नापूर्वीपासून प्रेमसंबंधात होते.

मात्र सोनालीचे जबरदस्तीने वेगळ्या मुलाशी लग्न लावल्याचे समजते आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: