गोव्यात त्रिशंकू विधानसभा?

पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांतील मतदान पार पडले असून या राज्यातील काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पार्टी या पक्षांची कलचाचणी समोर आली आहे. गोव्याच्या कलचाचणीनुसार, गोव्यात त्रिशंकू विधानसभा होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गोव्यात भाजपा आणि काँग्रेस सत्तास्थापनेसाठी चुरस रंगणार आहे. आम आदमी पार्टी गोव्यात खाते उघडणार का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
न्यूज १८ – गोव्याची कलचाचणी
भाजपा १८, आप ०२, काँग्रेस १७, इतर ०६
झी न्यूज – गोव्याची कलचाचणी
भाजपा १५, आप ०२, काँग्रेस १८, इतर ०३
टीव्ही ९ – गोव्याची कलचाचणी
भाजपा १८, आप ०३, काँग्रेस १२, इतर ०५
एबीपी – गोव्याची कलचाचणी
भाजपा १५, आप ०३, काँग्रेस १४, इतर ०२
साम टीव्ही – गोव्याची कलचाचणी
भाजपा १४, आप ०३, काँग्रेस १७, इतर ०५
आज तक – गोव्याची कलचाचणी
भाजपा १६, आप ००, काँग्रेस १८, इतर ०४
सरासरी ४० – गोव्याची कलचाचणी
भाजपा १६, आप ०२, काँग्रेस १६, इतर ०५