Sun. Sep 19th, 2021

Engineer मुलाच्या ‘नरबळी’साठी ‘त्याला’ हवी प्रशासनाची परवानगी!

एकीकडे पुरोगामीत्वाकडे देशाची वाटचाल सुरू असताना अजूनही अनेक ठिकाणी अंधश्रद्धेची मूळं घट्ट रूजलेली आहेत. इतकंच नव्हे, तर अजूनही अघोरी प्रथा चोरीछुप्या पद्धतीने अनेक ठिकाणी सुरू असतात. मात्र बिहारमधल्या एका घटनेने तर हद्दच गाठली आहे. इथे एका व्यक्तीने चक्क नरबळीसाठी प्रशासनाची परवानगी मागितली आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ आणि पत्र सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होतंय.

काय आहे पत्रात ?

बिहारमधील सुरेंद्र प्रसाद सिंह याने बेगूसराय प्रशासनाला पत्र पाठवलं आहे.

देवाला प्रसन्न करण्यासाठी चक्क ‘नरबळी’ देण्याची परवानगी मागितली आहे.

“नरबळी देणं गुन्हा नसून मला माझ्या देवानेच असं करण्याचा हुकूम दिलं आहे. सर्वप्रथम मी माझ्या इंजिनिअर मुलाचाच बळी देणार आहे.” असं पत्रात म्हटलं आहे.

29 जानेवारीला बेगूसरायच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं होतं.

मात्र उपविभागीय अधिकारी संदीव कुमार चौधरी यांनी मात्र असं कोणतंही पत्र मिळालं नसल्याचं म्हटलंय.

हा तर वेडा बाबा!

सुरेंद्र प्रसाद सिंह आपल्या विक्षिप्तपणामुळे ‘वेडा बाबा’ म्हणून ओळखला जातो.

गावात अनेकदा तो विवस्त्रच फिरत असतो.

प्रसिद्धीसाठी तो असं वागत असल्याचं देखील गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *