लोकमान्य टिळक टर्मिनसवर टीसीकडून मारहाण

मुंबई : मुंबईमधील लोकमान्य टिळक टर्मिनसवर टीसीने एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही व्यक्ती टिकट खिडकीवर कुशीनगर ट्रेनची माहिती विचारत होती. त्यात टीसीने याच व्यक्तीला वेटिंग हॉलची तिकिट आहे का असे विचारले आणि या व्यक्तीकडे तिकिट नसल्यामुळे त्याच्याकडून पैसे मागितले. मात्र पैसे नसल्यामुळे टीसीने या व्यक्तीला मारहाण केली आणि या घटने नंतरटीसी विरोधात कुर्ला जीआरपी येथे त्या व्यक्तीकडून तक्रार नोंदवण्यात आली आहे.