चक्क ‘या’ कारणामुळे सलून चालकावर गुन्हा

सध्या दाढी- मिशी ठेवण्याची नवीन फॅशन असून सर्वत्र याची चर्चा सुरू आहे. असाच एक प्रकार नागपूरच्या कन्हानमध्ये घडला आहे. एका सलून चालकाने एका व्यक्तिच्या मिशीवर ब्लेड चालवल्यामुळे पोलीस स्थानकात सलून चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं काय घडलं ?
नागपूरमध्ये सलून चालकाने परवानगी शिवाय मिशी कापल्यामुळे चांगलीच अद्दल घडवली आहे.
कन्हान येथील युवा संघटनेचे अध्यक्ष किरण किसन ठाकूर हे मंगळवारी सुनील लक्षणे यांच्या सलून मध्ये मिशी आणि दाढी करण्यासाठी गेले होते.
यावेळी सुनील लक्षणे यांनी किरण ठाकूर यांना काहीही न विचारता थेट त्यांच्या मिशीवर ब्लेड चालवले.
घरी परतल्यानंतर किरण ठाकूर यांनी सलून मालक यांना फोन केला.
तेव्हा ‘तू न विचारता माझी मिशी का कापली?’ असा प्रश्न ठाकूर यांनी लक्षणे यांना विचारला.
त्यावर तुला जे करायचे ते कर, असं उत्तर लक्षणे यांनी दिले.
त्यामुळे ठाकूर आणि लक्षणे यांच्यात शाब्दिक वाद झाला आणि हे प्रकरण थेट कन्हान पोलिसांत पोहोचलं.
संतापलेल्या किरण ठाकूर यांनी न विचारता मिशी कापल्याची तक्रार दिली आणि पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला.
पोलीस ठाण्यात अशा प्रकारची ही पहिलीच तक्रार आहे.
या घटनेमुळे सलून चालकावर काय कारवाई करायची हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा आहे.