Tue. Dec 7th, 2021

मुंबईत होर्डिंग अंगावर पडून एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. गुजरातमध्ये आलेल्या वायू चक्रीवादळामुळे मुंबईसह ठाणे, पालघर समुद्र पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच या चक्रीवादाळमुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत. चर्चगेट परिसरात होर्डिंग अंगावर पडून एका वृद्धाचा मृत्यू झाला. त्यामुळे गुजरातसह महाराष्ट्रला याचा मोठा फटका बसणार असल्याचे म्हटलं जात आहे.

नेमकं काय घडलं?

वायू चक्रीवादळामुळे चर्चगेट परिसरात होर्डिंग अंगावर पडून एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे.

माधव आप्पा नार्वेकर (62) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे 12 जून आणि 13 जूनला महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

आज सकाळपासून महाराष्ट्रात वायू चक्रीवादळामुळे मुंबईसह ठाणे, पालघर, या ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी,मुंबई, ठाणे, पालघर या भागांना सर्तकतेचं इशारा देण्यात आला आहे.

मच्छीमाऱ्यांना सुद्धा दोन दिवस समुद्रात मासेमारी न करण्यास आव्हान केले आहे.

या वायू चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत.

तसेच चर्चगेट परिसरात होर्डिंग पडल्यामुळे एका वृद्ध व्यक्तीच्या अंगावर पडून त्यांचा मृत्यू झाला आहे.

या घटंनेसाठी रेल्वे प्रशासन जबाबदार असल्यासाचा आरोपही काही प्रवाश्यांनी लावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *