बुलढाणामध्ये उष्माघाताने एकाचा मृत्यू

सध्या संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईसह इतर जिल्ह्यातही तापमानात वाढ झाली असून बुलढाण्यात ४१ अंशावर तापमान पोहोचले आहे. तपामानात प्रचंड वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्या नागरिकांच्या जीवावर बेतू लागले आहे. तापमानात वाढ होत असल्यामुळे उष्माघात म्हणजेच Sunstroke मुळे लोकांचा जीव धोक्यात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे पहिला उष्माघाताने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. विष्णू दत्तात्रय शिकारे यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं ?

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

विष्णू दत्तात्रय शिकारे यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे.

विष्णू शिकारे हे एका लग्न सोहळ्यासाठी मेहकर येथे आले होते.

यावेळी लोणार वेस फाट्यावर त्यांचा मृतदेह आढळला असल्याचे समजते आहे.

यापूर्वी सुद्धा परभणीमध्ये उष्माघाताने मृत्यू झाला असल्याचे समजते आहे.

उष्मघाताचे लक्षणे ?

उष्ण कोरडी त्वचा हे उष्मघाताचे पहिले लक्षणे आहेत.

तसेच ओठ सुजतात.

घाम येण्याचे बंद झाल्यामुळे त्वचा कोरडी पडते.

त्वचेचा रंग काळपट असेल तर नखे, ओठ आणि डोळ्या खालची पापणी रंग नेहमी पेक्षा रंग बदलल्याचे समजते.

तसेच मळमळ, उलट्या, डोकेदुखी आणि रक्तदाब कमी होतो.

त्यामुळे व्यक्ती बेशुद्ध होतो.

Exit mobile version