Wed. Jun 26th, 2019

एक छंद असा ही …

0Shares

प्रत्येक व्यक्तीचा छंद असतो. कोणाला पुस्तक वाचण्याचा तर कोणाला नाणी गोळा करण्याचा छंद असतो. मात्र बीड जिल्ह्यातील रहिवासी राम उदावंत यांना चोरीला गेलेल्या गाड्यांचा शोध लावून गाड्या मालकाला परत देण्याचा छंद जोपासत आहेत. त्यांच्या या छंदाला पोलिसांनीही चांगली साथ दिली आहे. राम यांच्या अशा आगळ्या- वेगळ्या छंदामुळे अनेकांना लाभ झाला आहे.

राम यांचा आगळा-वेगळा छंद –

बीड जिल्ह्यातील रहिवासी राम उदावंत एक वेगळेच छंद जोपासत आहेत.

गेल्या अनेक वर्षापासून चोरीला गेलेल्या गाड्यांचा शोध लावून गाड्या मालकाला परत करण्याचे छंद आहे.

पुणे, नगर, बीड आणि मुंबई या शहरांमधील सर्व पोलीस स्थानकात जाऊन गाड्यांचा शोध लावतात.

विशेष म्हणजे, राम हे या कामासाठी एकही पैसा घेत नाहीत.

त्यांच्या या कामामुळे पोलिसांनाही प्रचंड मदत होत असून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वाहनांची चौकशी करतात.

गाडीचा नंबर आणि लिस्ट काढून आर टी ओ ऑफिसमध्ये जाऊन गाडीच्या मालकाचे ओळख काढतात.

त्या व्यक्तीला पत्र पाठवून गाडी मिळाली असल्याची माहिती देत त्यांना पोलीस स्थानकात येण्यास सांगतात.

सध्या नाशिकमध्ये काम करत असून त्यांनी दोन दिवसात 250 गाड्या शोधून काढल्या आहेत.

त्यामुळे नाशिकमध्ये पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनीही त्यांचे कौतुक केले आहे.

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: