Fri. Jun 21st, 2019

कोट्यवधींची संपत्ती दान करून ‘ते’ सहपरिवार बनले संन्यासी!

0Shares

सध्या पैसा आणि संपत्ती कमावण्यासाठी लोक काहीही करतात. अगदी एखाद्याचा जीवही घेतात. मात्र या दलदलीत राहून विरक्त आयुष्य जगण्याची इच्छा असलेले काही जण आहेत. यापैकीच एक कुटुंब सातारा जिल्ह्यातील कराड शहरात आहे.

कराड शहरातील व्यापाऱ्यांमध्ये मोठं नाव असलेल्या विमलचंद भवरलाल छाजेड यांच्या संपूर्ण कुटुंबाने संन्यास घेतलाय… तेही कोट्यावधीची संपत्ती दान करून…

काय केलंय छाजेड यांनी?

कराडमधल्या व्यापारयांमधील एक प्रसिद्ध नाव म्हणून विमलचंद भवरलाल छाजेड यांच नाव घेतल जातं.

व्यापारानिमित्त कराडमध्ये स्थायिक झालेल्या कुटूंबातील सर्वच सदस्यांनी मेहनत करुन कोट्यावधीची संपत्ती जमवली.

हे करताना या कुटुंबाने कायम आपलं दातृत्त्व कराडकरांना दाखवल.

धार्मिक कार्यक्रमात हे कुटुंब नेहमी पुढे असतं.

आठ वर्षांपूर्वी विमलचंद छाजेड यांचे पुतणे, पुतणी आणि बहिणींने संन्यास घेतला.

त्यानंतर विमलकुमार यांनीही जैन समाजाच्या कामात झोकून दिले. तरीही व्यापारामुळे त्यांना जास्त वेळ देता येत नव्हता.

म्हणून उर्वरित कुटुंबासह त्यांनीही संन्यास घेतला.

त्यांनी आपली सर्व संपत्तीही विविध मार्गाने दान केली आणि संन्यस्त दिक्षा घेतली.

देशभरातील जैन समाजामध्ये सन्यास घेण्याची परंपरा आहे.

आपल्या सर्व सुखांच्या त्याग करुन या समाजातील अनेक व्यक्ती ज्ञानदानासाठी आयुष्य वेचतात.

यामध्ये छाजेड कुटुंबियांनी केलेला त्याग देशात उत्सुकतेचा विषय ठरला आहे.

यामुळे ही घटना समाजाला अभिमानास्पद वाटते

पैसा मिळवण्यासाठी वाममार्गाकडे झुकणारे लाखो जण भेटतात. तसंच त्याग करणारे, दान करणारेही भेटतात. मात्र सर्वस्व दान करुन
समाजाच्या मदतीसाठी आयुष्य घालवणारे दुर्मिळच…

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: