Wed. Oct 5th, 2022

युट्यूबच्या आधारे अल्पवयीन मुलीने केला गर्भपात

नागपुरमध्ये अल्पवयीन मुलीने युट्यूबच्या माध्यमातून स्वत:चा गर्भपात केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. नागपुरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने युट्यूबरील माहितीच्या आधारे गर्भपात केला. हा प्रकार कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. हे प्रकरण उघडकीस झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पीडितेची प्रकृती सध्या ठीक आहे.

काय आहे प्रकरण?

संबंधित अल्पवयीन मुलगी नागपूरमधील रहिवासी आहे. मागील दोन वर्षांपूर्वी या मुलीचे गावातील २७ वर्षापूर्वी तरुणाशी प्रेमसंबंध होते. वर्षभरापूर्वी या तरुणाला नागपुरातील रुग्णालयात नोकरी लागल्यामुळे तो नागपुरातील एमआयडीसी परिसरात राहू लागला. दरम्यान, ते दोघेही एकमेकांना भेटू लागले. सहा महिन्यांपूर्वी या मुलीने त्या तरुणाच्या खोलीत मुक्काम केला होता. यावेळी त्यांच्यात शाररिक संबंध घडले. त्यानतंर ही तरुणी गरोदर असल्याचे समजताच या तरुणाने रुग्णालयातील काही औषधे दिली. मात्र, त्या औषधांचा काहीही उपाय झाला नाही. त्यानंतर युवतीने युट्यूबवर गर्भपात करण्याचे व्हिडिओ पाहिले. त्या व्हिडिओंमध्ये गर्भपात करण्याचे गावठी औषधाची माहिती घेत तीने ते औषध घेतले. त्यानंतर चार दिवसांपूर्वी युवतीचा गर्भपात झाला. यावेळी, मुलगी बेशुद्ध पडून पाच महिन्यांचे बाळ जमिनीवर पडले होते. पालकांना माहिती मिळताच, कुटुंबियांनी मुलीला रुग्णालयात दाखल केले. मुलीवर डॉक्टरांनी उपचार केले असून ती आता ठीक आहे. मात्र, त्या नवजात बालकाचा मृत्यू झाला.

दरम्यान, या प्रकरणी पालकांनी ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी युवतिच्या प्रियकरावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला  आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.