Jaimaharashtra news

ऑलिम्पिकमध्ये खेळाडूवर कारवाई;प्रतिस्पर्धी खेळाडूचा चावला कान

जपानची राजधानी टोकियो येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक २०२० स्पर्धेत एक धक्कादायक घटना घडली आहे. बॉक्सिंगच्या ९१ किलो वजनी गटातील सामन्यात मोरक्कोच्या एका खेळाडूने प्रतिस्पर्धा न्यूझीलंडच्या खेळाडूचा कान चावला.

या घटनेनंतर पंचांनी मोरक्कोच्या खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवला. मोरक्कोच्या युनूस बल्ला या बॉक्सरने तिसऱ्या फेरीत माइक टायसन प्रमाणे रिंग डेव्हिड न्याका या न्यूझीलंडच्या बॉक्सरचा कान चावण्याचा प्रयत्न केला.

या घटनेनंतर सर्व पंचांनी मिळून युनूसचा पराभव झाल्याचे जाहीर केले. यामुळे न्याका क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला. युनूसने माउथ गार्ड घातले होते. त्यामुळे न्याकाच्या कानाला कोणतीही दुखापत झाली नाही.

Exit mobile version