हिंदू असल्याची बतावणी करत मुस्लिम इसमाने केलं हिंदू मुलीशी विवाह…

राजस्थानमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इम्रान खान नामक एका मुस्लिम इसमाने हिंदू कुटुंबाची फसवणूक करून त्यांच्या मुलीशी विवाह केला. मुलीच्या कुटुंबाकडे कबीर शर्मा असं नाव सांगून आणि खोटी ओळख देत त्याने मुलीच्या कुटुंबियांना फसवलं. इतकंच नव्हे, तर आपले आई-वडील आणि लग्नात आणलेले नातेवाईकदेखील बनावट असल्याचं नंतर मुलीच्या कुटुंबियांना समजलं.

काय घडलं नेमकं?

राजस्थानातील सिकर येथे इम्रान खान नावाच्या इसमाने आपण हिंदू असल्याची खोटी बतावणी केली.

आपलं नाव कबीर शर्मा असल्याचं त्याने मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना सांगितलं.

इम्रान खानने याने हिंदू कबीर शर्माचं सोंग अशा रीतीने वठवलं, की कुणालाच त्याबद्दल संशय आला नाही.

त्याने मुलीशी हिंदू पद्धतीने विवाह केला. या लग्नासाठी 11 लाख रुपये खर्च करण्यात आल्याचंही वृत्त एका वृत्तवाहिनीने दिलं आहे.

मात्र लग्नानंतर जेव्हा गौप्यस्फोट झाला, तेव्हा मात्र सर्वांनाच धक्का बसला.

कबीर शर्मा हा प्रत्यक्षात इम्रान खान नामक मुस्लिम इसम आहे आणि या सत्यतेबद्दल त्याने आपल्याला अंधारात ठेवलं हा मोठा धक्का होताच, पण त्याहूनही मोठा धक्का बसला जेव्हा इम्रान हा आधीच विवाहीत असल्याचं मुलीच्या कुटुंबियांना कळलं. एवढंच नव्हे, तर त्याला 3 मुलंही असल्याचं समोर आलं.

मुलींच्या कुटुंबियाकडून अडीच लाख रुपयांचे दागदागिने आणि काही रक्कमही या भामट्याने लंपास केली आहे. इम्रान खान मुलीसोबत निघून गेल्यानंतर आता दोघेही बेपत्ता झाल्याने मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार केली आहे.

Exit mobile version