Wed. Aug 21st, 2019

या रहस्यमय मंदिरात कुणी प्रवेश करत नाही, कारण…

हिमाचल प्रदेशात असं एक मंदिर आहे जिथे लोक पाय ठेवायलाही घाबरतात… असं काय आहे या मंदिरात?

0Shares

भारतात लाखों मंदिरं आहेत आणि त्यातील अनेक मंदिरांच्या विविध आख्यायिका असतात. मात्र बहुतांश मंदिरांत दर्शनासाठी तसंच प्रार्थनेसाठी भाविक जातात. अनेक ठिकाणी जागृत देवस्थानं असल्याने लोक नवस करण्यासाठी किंवा फेडण्यासाठीही मंदिरात जातात. संकटांपासून मुक्ती मिळावी, शक्ती मिळावी म्हणून श्रद्धेने लोक मंदिरात जातात. मात्र हिमाचल प्रदेशात असं एक मंदिर आहे जिथे लोक पाय ठेवायलाही घाबरतात… असं काय आहे या मंदिरात?

हे मंदिर माणसांसाठी नव्हे!  

हिमाचल प्रदेशातल्या भरमोर गावात एक असं मंदिर आहे जिथे जायला लोक घाबरतात.

मंदिरात लोक जातात खरे, पण मंदिराच्या गाभाऱ्यात कुणीही प्रवेश करायची हिंमत करत नाही.

कारण हे मंदिर आहे साक्षात मृत्यूची देवता मानल्या जाणाऱ्या यमदेवाचं.

या मंदिराच्या गर्भगृहात यमदेव गुप्तरूपाने वास करत असल्याचं मानलं जातं.

मंदिराच्या गाभाऱ्यातून केवळ यमदेवच येऊ आणि जाऊ शकतो, असं सांगितलं जातं.

मनुष्याचे प्राण हरण केल्यानंतर यमलोकात जाताना यमदेवाची पहिली विश्रांतीची जागा म्हणजे हे मंदिर अशी मान्यता आहे.

मृतात्म्यांना घेऊन यम यमलोकात जात असताना या ठिकाणी गाभाऱ्यात यमदेव काही वेळासाठी थांबतो.

या मंदिरात चित्रगुप्ताचादेखील एक लहानसा कक्ष आहे.

मनुष्य मृत्यू पावल्यावर त्याच्या पाप-पुण्याचा हिशेब चित्रगुप्त करतो.

यमधर्माचं अशा प्रकारचं हे एकमेव मंदिर आहे.

या मंदिराला चार दरवाजे आहेत.

यातील प्रत्येक दिशेचे दरवाजे वेगवेगळ्या धातूंचे आहेत.

सोनं, चांदी, तांबं आणि लोखंड या चार धातूंच्या चार वेगवेगळ्या दरवाजातून मृतात्म्यांना परलोकात पाठवलं जातं.

पुण्य जास्त करणाऱ्यांना सोन्याच्या दरवाजातून तर पापं जास्त करणाऱ्यांना लोखंडाच्या दरवाजातून नेल जात असल्याचं मानलं जातं.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *