Jaimaharashtra news

युरोपमध्ये कोरोनाची नवी लाट

युरोपमध्ये कोरोनाची नवी लाट आली असून ब्रिटनमध्ये गुरुवारी कोरोनाचे २६ हजार नवे रुग्ण सापडले . २९ जानेवारीपासून आतापर्यंत त्या देशात आढळलेल्या नव्या रुग्णांचे हे सर्वाधिक प्रमाण आहे. जानेवारी महिन्यात ब्रिटनमध्ये कोरोना साथीने भीषण स्वरूप धारण केले होते. त्यावेळी दररोज हजार लोक कोरोनाचे बळी ठरत होते. ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरण मोहीम वेगाने राबविली गेली. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण झपाट्याने कमी झाले आहे. तसेच प्रौढ व्यक्तींपैकी ८४.९ टक्के लोकांना कोरोना लसीचा एक डोस तर ६२.४ टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. युरोपमध्ये कोरोना साथीची नवी लाट येण्याची जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केलेली भीती खरी ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मागील दहा आठवडे युरोपमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी होती, पण आता त्यात पुन्हा वाढ होऊ लागली आहे.

Exit mobile version