Fri. Oct 18th, 2019

कल्याणच्या सर्वोदय मॉलमध्ये समोस्यात आढळला कपड्याचा तुकडा

चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहात गेल्यानंतर मध्यंतराच्या काळात पॉप-कॉर्न, समोसा अशा विविध खाण्याच्या वस्तू विकत घेतो. मात्र कल्याण येथील सर्वोदय मॉलच्या एस एम 5 थिएटरमध्ये एका तरूणीला चक्क समोसामध्ये कपड्याचा तुकडा आढळला. मध्यंतरामध्ये तरूणीला भूक लागल्यामुळे तिने 90 रुपयांचा समोसा विकत घेतला. मात्र त्या समोसामध्ये कपड्याचा तुकडा आढळल्यामुळे चित्रपटगृहाच्या स्वच्छेतेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

नेमकं काय घडलं ?

कल्याणच्या सर्वोदय मॉलमध्ये एस एम 5 थिएटरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.

प्रतिमा खरात या चित्रपटगृहात चित्रपट बघण्यासाठी गेली होती.

मध्यंतराच्यावेळी भूक लागल्यामुळे प्रतिमाने 90 रुपयाचा समोसा विकत घेतला.

मात्र या समोसामध्ये चक्क कपड्याचा तुकडा आढळला.

यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाल्या.

त्यांनी चित्रपटगृहातील स्टाफला याबाबत विचारणा करत सोशल मीडियावर नागरिकांनी जागरूक राहण्याचे संदेश दिले.

तसेच चित्रपटगृहातील कर्मचाऱ्याला कपड्याचा तुकडा असणाऱ्या समोसा खाण्यास सांगितले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *