Mon. Jan 24th, 2022

झोपडीत राहणाऱ्या व्यक्तीला चक्क ‘एवढं’ रुपयांचे वीज बिल

या प्रश्नांचे उत्तर त्यांना वीज कार्यालयात  नाही मिळाले.  म्हणून त्यांनी टीम “द युवा संघटनेचे”  अध्यक्ष योगेश चलवादी  याच्याशी संर्पक साधाला. 

वीज बिल वाचवण्यासाठी अनेक जण बेकायदाशीर प्रकार करत असतात. मात्र अंबरनाथमध्ये जावसई परिसरातील महेंद्रनगर येथे राहणारे इलाम पठाण यांना धक्का बसणारे वीज बिल आले आहे. ५ हजार नाही, १० हजार नाही तर चक्क १७ हजार ८३० रुपयांचे वीज बिल आले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे इलामचा मोठा फ्लॅट किंवा बंगला नसून छोटीशी झोपडी असल्याचे इलामने सांगितले आहे. वीजेचे बिल बघताच इलामला आश्चर्याचा धक्का बसला.

नेमकं काय घडलं ?

अंबरनाथमध्ये एका झोपडीत राहत असलेले इलाम पठाण यांना चक्क १७ हजार ८३० रुपयांचे वीज बिल आले आहे.

इलाम पत्नीसह राहत असून त्यांच्या घरात फक्त २ पंखे आणि २ दिवे असल्याने एवढं बिल आल्यामुळे आश्चर्याचा धक्का बसला आहे.

एक महिन्याचे बिल १७ हजार आल्यामुळे इलाम यांनी वीज कार्यलयात चौकशी केली.

मात्र कार्यलयातून योग्य उत्तर मिळत नसल्यामुळे त्यांनी द युवा संघटनेचे अध्यक्ष योगेश चलवादी यांच्याशी संपर्क साधला.

मंगळवारी दुपारी या घटनेच्या निषेधार्थ चलवादी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी वीज कार्यलयात ठिय्या आंदोलन केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *