Thu. Jan 20th, 2022

पंतप्रधान मोदींचा जीव घेण्याचा कट शिजतोय; चिथावणीखोर व्हिडीओ वायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनांचा ताफा पंजाबच्या फिरोजपूरमध्ये अडवण्यात आला. त्यामुळे पंतप्रधानांना काही वेळ उड्डाणपुलावरच अडकून रहावे लागले. मात्र या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडवायची चिथावणी पंजाबात गेले अनेक दिवस समाज माध्यमात वायरल होत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीव घेण्याचा कट शिजत असल्याचा आरोप भाजप करत आहे. तसेच पंतप्रधानांच्या सुरक्षेत हयगय झाली असून केंद्रीय स्तरावरून चौकशी सुरू आहे.

पंतप्रधान मोदी घरातून निघाल्यावर त्यांना वाटेत एखाद्या पुलावर अडवायचे आणि घेरून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करायचा, असा चिथावणीखोर व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल करण्यात आला आहे. ५ जानेवारी रोजी तसेच झाले होते. पंतप्रधान अचानक रस्तामार्गे शहीद स्मारकाला जायला निघाले आणि त्यांना पुलावरच अडवण्यात आले. या सगळ्यात विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्धणपुलावरच रोखून धरण्यात आले. सुरक्षा यंत्रणांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत वाहनांचा ताफा उलट फिरवला आणि अनर्थ टाळला.

त्यामुळे समाज माध्यावर वायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये या कटाची शक्यता व्यक्त होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *