पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर हाणामारी; ‘या’ नेत्याची पत्रकाराला मारहाण

पाकिस्तानमध्ये एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात इम्रान खान यांच्या नेत्याने पत्रकाराला हाणामारी केल्याची घटना घडली आहे. वृत्तवाहिनीवर सुरू असलेल्या पीटीआयच्या एका नेत्याने पत्रकारालाच मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चर्चासत्र सुरू असताना शाब्दिक वादापासून सुरुवात झाली. त्यानंतर हा वाद वाढून हाणीमारीपर्यंत पोहोचली.

नेमकं काय घडलं ?

पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर चर्चासत्र सुरू असताना अचानक एका नेत्याने पत्रकारावर मारहाण करण्यास सुरुवात केली.

पीटीआय हा पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष आहे.

या पक्षाचे एक नेते मंसूर अली सियाल यांनी पत्रकारावर मारहाण केल्याचे समजते आहे.

मंसूर अली सियाल यांना चर्चा करण्यासाठी चर्चासत्रासाठी बोलवण्यात आले होते.

या चर्चासत्रेत कराची प्रेस क्लबचे अध्यक्ष इम्तियाज खान यांनाही बोलवण्यात आले होते.

चर्चा सुरू असताना पत्रकार आणि मंसूर यांच्यामध्ये वाद झुंपला.

इम्तियाज खान यांनी मंसूर यांना खुर्चीवरुन खाली पाडलं.

यामुळे दोघांमध्येही हाणामारी सुरू झाली आणि वाद पेटला.

Exit mobile version