औरंगाबाद क्रांती चौकात शिवप्रेमींचा जल्लोष

औरंगाबाद येथे क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भारतातील सर्वात उंच अशा अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आले. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच उद्योग मंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे, खा. इम्तियाज जलील तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील आमदार यांच्या उपस्थित होते.
औरंगाबाद शहरातील क्रांती चौकातील पुतळ्याची उंची वाढवण्यात यावी अशी अनेक शिवभक्त नागरिकांची मागणी होती. ही मागणी मान्य करत औरंगाबाद महापालिकेने २०१९ ला मान्यता दिली. या पुतळ्याची उंची २१ फूट असुन चौथऱ्याची उंची ३१ फुट आहे. जमिनीपासून तब्बल ५२ फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला असुन पुतळ्याचे वजन ७ मेट्रिक टन आहे.
पुतळ्याखाली असलेल्या चौथऱ्याभोवती २४ कमानीमधे २४ मावळ्यांच्या प्रतिकृती आहे. दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्याच्या वास्तुने प्रेरित होत या चौथऱ्याचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचा अनावरण सोहळा भव्य अशा आकर्षक रोषणाईने, फुलांच्या सजावटीने, फटाक्यांच्या आतिषबाजीने व शिवप्रेमी जनतेच्या उत्साहात हा संपन्न झाला.