Sun. Aug 25th, 2019

शरीरसुखासाठी प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची हत्या

0Shares

गुरू शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारा दुर्दैवी प्रकार सांगली येथील शांती निकेतन मुक्त विद्यापीठात उघडकीस आला आहे. शरीरसुखाची मागणी पूर्ण करण्यास नकार देणाऱ्या विद्यार्थिनीची प्राध्यापकाने हत्या केल्याचं समोर आलंय.

12 डिसेंबर रोजी एका विद्यार्थिनीचा मृतदेह क्लासरूममध्ये आढळून आला. यासंदर्भात पोलिसांनी तपास सुरू केल्यावर ऋषीकेश कुडाळकर या प्राध्यापकाकडून तिला होणाऱ्या त्रासाची माहिती मिळाली. तसंच विद्यार्थिनीच्या क्लासरूममध्ये आरोपी शिरल्याचं सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसून आलं.

आरोपी प्राध्यापक ऋषीकेश कुडाळकर हा मृत विद्यार्थिनीच्या गावातीलच होता. दोघांमध्ये आधी प्रेमसंबंध असल्याचंही सांगण्यात येत आहे. मात्र नंतर ऋषिकेश विद्यार्थिनीवर जबरदस्ती करू लागला. तिला वारंवार त्रास देऊ लागला. ऋषिकेशने आपल्या कबुलीजबाबात मान्य केलं की त्याने विद्यार्थिनीला क्लासरूममध्ये जाताना पाहून तिच्यामागे तो शिरला. त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र तिने नकार दिल्यामुळे त्यांच्यात वाद झाला. संतापाच्या भरात त्याने तिचं डोकं जोरात भिंतीवर आदळलं. यातच तिचा मृत्यू झाला.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *