Fri. Dec 3rd, 2021

ISRO कडून अवकाशात झेपावणार ‘व्योममित्रा’

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोकडून गगनयान मिशनवर झपाट्याने काम सुरू आहे. पहिल्यांदाच भारतीय संस्था इस्रो ‘व्योममित्रा’नावाच्या रोबोटला अवकाशात पाठविण्याची तयारी करत आहे. 2022 मध्ये भारतीय अवकाशवीरांना अवकाशात पाठवण्याची योजना आहे. त्यासाठी व्योममित्रा या रोबोटला इस्रो अवकाशात पाठविणार आहे.

भारताची अशाप्रकारची पहिलीच मोहिम असल्यानं यात अनेक प्रकारचे जोखीम असणार त्यामुळे इस्रो ही पहिल्यांदा मानवी रोबोट अवकाशात पाठविण्याच्या तयारीत आहे. भारत पहिल्यादा एका महिला रोबोटला अवकाशात पाठविणार आहे. 15 ऑगस्ट 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन मिशन गगनयानची घोषणा केली होती.

जरी मिशन गगनयानमध्ये महिला अंतराळवीराचा समावेश नसेल मात्र पहिल्यांदा महिला रोबोट अवकाशात जाणार आहे. जानेवारी 2019 मध्ये इस्रो मानवी रोबोट अवकाशात पाठवणार अशी चर्चा होती.

‘व्योममित्रा’ या रोबोटमध्ये आकाशात माणसाप्रमाणे वेगवेगळे प्रयोग करण्याची क्षमता आहे.

व्योममित्रा दोन वेगवेगळया भाषांमध्ये बोलू शकते.

हा रोबोट मानवाप्रमाणे काम करतो त्याप्रमाणे हा रोबोट देखील करणार आहे.

आमचं हे पहिलं अवकाश मिशन वाया जाणार नाही, असा विश्वास के. सिवन यांनी व्यक्त केलाय.

मिशन गगनयानसाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे. या अंतरावीरांचं सध्या प्रशिक्षण रशियामध्ये सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *