Tue. Aug 3rd, 2021

Youtube वर व्हिडिओ, आत्महत्येचा आराखडा आणि शाळकरी मुलाची आत्महत्या!

नालासोपाऱ्यात राहणाऱ्या एक 13 वर्षीय मुलाने आपल्या सोसायटीतील गार्डनमध्ये गळफास लावून आत्महत्त्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे या चिमुकल्याने मारणाआधी आपल्या आत्महत्येचा आराखडा तयार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

 

आणि केली आत्महत्या…

हुसेफा हा टेकनोसॅव्ही होता तो सतत युट्यूब वरून व्हिडिओ बघून सतत काही ना काही बनवत असायचा.

15 जानेवारी रोजी रात्री हुसेफा खाली खेळायला जातो असं सांगून गेला, तो परत आलाच नाही.

जेवणानंतर शतपाऊली साठी आलेल्या लोकांनी हुसेफा सोसायटीतील गार्डनमधील एका खांबाला लटकून उभा असल्याचं दिसलं.

पण तो काहीच हालचाल करत नसल्याने लोकांना संशय आला.

त्यांनी जेव्हा जवळ जाऊन पाहिलं तेव्हा त्यांना धक्काच बसला.

हुसेफाने नायलॉन च्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

 

हे ही वाचा- ‘ऑनलाईन स्वर्गप्राप्ती’च्या नादात 15 वर्षीय मुलीची आत्महत्या!

 

धक्कादायक आराखडा

जेव्हा हुसेफाच्या दप्तराची तपासणी केली, तेव्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला.

हुसेफाने आपल्या एका वहीत आत्महत्येचा आराखडाच तयार केला होता.

त्यात त्याने आपल्या मृत्यूची वेळ सुद्धा लिहली होती.

या वहीत एक पंख्याचे चित्र असून त्यात एक मुलगा गळफास घेत असल्याचं चित्र होतं.

हुसेफाने याआधीसुद्धा आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचं म्हटलं जातं होतं.

तो आपल्या मोबाईलच्या youtube वर ‘फासी का फंदा’ हे ऍपसुद्धा तपासलं असल्याचं निष्पन्न झालं.

तुलिंज पोलिसांनीं या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे. मात्र अद्यापही हुसेफाच्या आत्महत्येचं कारण समोर आलेलं नाही. यापूर्वीही यूट्यूबवर स्वर्गप्राप्तीसंदर्भातले व्हिडिओ ऍपवर वारंवार पाहून 15 वर्षीय मुलीने घराच्या बाथरूम गळफास लोवून आत्महत्या केल्याची घटना भोईवाडा येथे घडली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *