Thu. Sep 29th, 2022

पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळून ८ कामगार जखमी

नगर शहराजवळील  देहरे  येथील नगर-मनमाड रोडवर पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळून अपघात झाला.

या अपघातात ८ कामगार जखमी झाले आहेत.

अपघाताचं नेमकं कारण काय ?

जलशुद्धीकरण प्रकल्पाअंतर्गत देहरे इथं पाण्याची टाकी बांधली जात होती.

टाकीचे बांधकाम काम सुरू असताना स्लॅब कोसळला.

औरंगाबादच्या शारदा इन्फ्रास्ट्रक्चरला हे काम देण्यात आलं होतं.

दुसऱ्या मजल्यावर काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळला.

स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली दहा कामगार अडकले.

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तिथं धाव घेतली.

मदत पथकासह पोलीसही घटनास्थळी पोहोचले.

त्यांनी जखमींना उपचारासाठी जवळच्या दवाखान्यात हलवलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.