Tue. May 17th, 2022

इंडिया गेटजवळ सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारणार

प्रजासत्ताक दिनापूर्वी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राजधानी दिल्लीमधील इंडिया गेटवरील अमर जवान ज्योत आता राष्ट्रीय युद्ध स्मारकावर प्रज्वलित झाली आहे. त्यामुळे सुमारे ५० वर्षांपासून प्रज्वलित असलेली अमर जवान ज्योतीचे आता राष्ट्रीय युद्ध स्मारका विलीनीकरण झाले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसने आक्षेप नोदंविला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे.

इंडिया गेटजवळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दिली आहे. पंतप्रधानांनी ट्विट केले की, ‘संपूर्ण देशात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५वी जयंती साजरी होत आहे. यावेळी मला सांगताना आनंद होत आहे की, इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ग्रेनाईटचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. नेताजींचा हा पुतळा त्यांच्याविषयी असलेले भारताच्या कृतज्ञतेचे प्रतिक असेल,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले. तसेच येत्या २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त या पुतळ्याचे अनवरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ज्या ठिकाणी पुतळा उभारण्यात येणार आहे, त्या ठिकाणी आधी जॉर्ज पंचम यांचा पुतळा होता. काँग्रेस सरकारच्या काळात हा पुतळा हटवून कोरोनेशन पार्कमध्ये स्थलांतरित करण्यात आला. तेव्हापासून ही जागा रिकामी आहे. त्यामुळे आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५व्या जयंमीनिमित्त त्यांचा पुतळा उभारण्यात येणार असून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचे स्मरण केले जाणार आहे.

1 thought on “इंडिया गेटजवळ सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारणार

  1. Im still learning from you, but Im trying to achieve my goals. I certainly love reading everything that is written on your site.Keep the tips coming. I loved it!

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.