पुण्यात भररस्त्यात अनोळखी व्यक्तीने केलं तरुणीला जबरदस्ती Kiss!

महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुण्यासारख्या शहरातील लष्कर परिसरामध्ये भररस्त्यात एका इंजिनिअरिंग शिकणाऱ्या तरुणीचा अनोळखी व्यक्तीने विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. लष्कर परिसरातील जे एम रोडवर पीडित तरुणीवर 42 वर्षीय व्यक्तीने भररस्त्यात kiss केलं. त्याच्या या वर्तनाबद्दल लष्कर पोलीस ठाण्यातच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला आता अटकही करण्यात आलंय.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पीडित तरुणी लष्कर परिसरातून जात होती.

त्यावेळी एका मित्राला पत्ता विचारण्यासाठी तिने मोबाईल कॉल केला.

मात्र बॅटरी डाऊन झाल्यामुळे तिचा कॉल अर्ध्यातच कट झाला.

तिचा फोन बंद झाल्यामुळे रस्त्यावरून जात असलेल्या एका व्यक्तीकडील फोन मागितला.

या व्यक्तीने आपला मोबाईल दिल्यावर तिने मित्राला त्या नंबरवरून कॉल केला आणि पत्ता विचारला. आपलं काम झाल्यावर तरुणीने मोबाईल परत करून आभार मानले.

मात्र त्या व्यक्तीने तिच्या ‘Thanks’ला प्रतिसाद देताना थेट तिचा हात पकडून तिला जवळ ओढलं आणि जबरदस्तीने किस केलं.

अचानक त्याने केलेल्या या कृत्यामुळे ती घाबरून गेली. तिने याबाबत तक्रार केली. पोलिसांनी या आरोपीला आता अटककेली आहे.

Exit mobile version