Fri. Sep 30th, 2022

गॅस वाहतूक करणारा टॅंकर नदीत कोसळला

 मुंबई-गोवा महामार्गावर गुरूवारी दुपारच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे. एक गॅस कंटनेर थेट पुलावरुन खाली नदीत कोसळला. अपघात खूप भीषण घडला आहे. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. कंटेनरमध्ये गॅस होता. अपघातामुळे गॅस लिकीज होऊ लागला होता. त्यामुळे प्रशासनाने त्या पुलावरुन जाणारी वाहतूकच पर्यायी मार्गाला वळवली आहे. या अपघाताच्या घटनेमुळे संबंधित परिसरात खळबळ उडाली आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.

गॅस वाहतूक करणारा कंटेनर टॅंकर मुंबई-गोवा महामार्गावर लांजा नजीक आंजणारी पुलावरून थेट काजळी नदीत कोसळला. या भीषण अपघातात टँकर चालकाचा, केबिनमध्ये अडकून पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला. ही घटना दुपारी घडली. गोव्याच्या दिशेने जाणारा एमएच १२ एलटी ६४८८ कंटेनर मुंबई-गोवा महामार्गावर आंजणारी येथील पुलाचा कठडा तोडून थेट काजळी नदी जाऊन कोसळला. या भीषण अपघातामध्ये चालकचा बुडून जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्ळी पोलीस आणि बचाव पथक दाखल झाले.

वाहतूक पोलिसांच्या प्रयत्नाने क्रेनच्या सहाय्याने सायंकाळी साडेचार वाजता टॅंकर बाजुला करुन चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. हा कंटेनर नदीत पडल्याने या गॅस टँकरला पाठीमागून गळती सुरू झाली असून सुरेक्षेच्या दृष्टीने मुंबई-गोवा मार्गांवरील वाहतूक सध्या पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

1 thought on “गॅस वाहतूक करणारा टॅंकर नदीत कोसळला

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.