Tue. Sep 27th, 2022

नव्या विषाणू संसर्गाची भीती असताना पुण्यात नाट्यगृह खुली

देशातील कोरोना परिस्थितीत काही प्रमाणात शिथिलता येत आहे. मात्र दरम्यान दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंटमुळे जगभरात चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेत सर्व राज्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. अशातच  पुण्यात नाट्यगृह, चित्रपटगृहांंना पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आलीआहे.

कोरोना काळात राज्यात सर्वत्र टाळेबंदी असून चित्रपटगृह, नाट्यगृहांना टाळे लागले. मात्र गेल्या दीड वर्षानंतर कोरोना परिस्थिती काही प्रमाणात स्थिरावली असल्यामुळे हळूहळू टाळेबंदी शिथिल करण्यात आली. अशातच आता पुण्यात चित्रपटगृह, सांस्कृतिक केंद्र आणि नाट्यगृहांना येत्या १ डिसेंबरपासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा कमी असल्यामुळे अजित पवारांनी चित्रपटगृह, नाट्यगृहांना पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास पगवानगी दिली आहे. येत्या १ डिसेंबरपासून पुण्यातील चित्रपटगृह, सांस्कृतिक केंद्र आणि नाट्यगृहांना पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला आहे. तसेच यासंबंधी पालकमंत्र्यांनी नियमावली सादर केली आहे. त्यामुळे पुणेकरांना या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत पुण्यातील चित्रपटगृहांबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मात्र नागरिकांना कोरोना नियमाचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.