Tue. Apr 7th, 2020

डॉकयार्ड रेल्वे स्थानकावर चोरट्याने केली तिकीटघरात चोरी

रेल्वे स्टेशनवर अनेकदा चोरटे चोरी करण्यासाठी फिरत असतात. मात्र डॉकयार्ड रेल्वे स्थानकावर चोरट्याने तिकीटघरात घुसून चोरी केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. चोरी करणाऱ्या आरोपीला वडाळा रेल्वे पोलिसांनी अटक केल्याचे समजते आहे. या चोरट्याने तिकीटघरातून 3 हजार 886 रुपये चोरी करत पलायन केले. रेल्वे बुकिंग कर्मचाऱ्याने चोरी केल्याची तक्रार दाखल केली.

नेमकं काय घडलं ?

डॉकयार्ड रेल्वे स्टेशनवरील तिकीटघरात घुसून पैसे चोरी केल्याची घटना घडली आहे.

ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून आरोपीला अटक करण्यात यश मिळाले आहे.

आरोपीचे नाव सुनील राठोड असून कॉटनग्रीन येथे राहतो.

ही घटना 7 जुलै रोजी घडली असून त्याचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्ट दिसत नसल्याचे समजते आहे.

यासाठी पोलीस अधिकारी राजेंद्र पाल यांनी विशेष पथक स्थापन केले होते.

मंगळवारी डॉकयार्ड स्थानकावर गस्ती घालत असताना पोलिसांना राठोड संशयास्पद फिरत असल्याचे दिसले.

त्याचबरोबर सीसीटीव्हीमध्ये आरोपीच्या चेहऱ्याशी जुळत असल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले.

सुनील राठोडला वडाळा रेल्वे पोलीस स्थानकात नेण्यात आले.

या चोरट्याने तिकीटघरातून 3 हजार 886 रुपये चोरी करत पलायन केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *