Thu. Jan 27th, 2022

ठाण्याच्या टीडीआरएफ टीमचा अंगावर काटा आणणारा अनुभव

महाडमधील तळीये गावात दरड कोसळली तो भाग अतिदुर्गम झाला होता . ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी तुफान पाऊस, पूरस्थ‍िती आणि असंख्य अडचणी असतानाही एनडीआरएफ जवानांच्याही अगोदर ठाण्यातील जवानांचे दल घटनास्थळी पोहचले, मदत कार्याला लागले आणि निसर्गाच्या रौद्र रुपासमोर निधड्या छातीने सामोरे गेले, गावकऱ्यांना धीर दिला, त्या जवानांचे सर्वत्र कौतुक होत आहे. चार दिवसांच्या अथक परिश्रमानंतर हे जवान आता ठाण्यात परतलेत.

१३ जणांच्या या पथकाने अतुलनीय असे काम केले आहे. हे बचावकार्य करताना अनेकांच्या पायाला, हाताला खिळे, पत्रे, झाडे लागली मात्र त्यांनी आपले काम थांबवले नाही. काय होते या जवानांचे थरारक अनुभव आणि किती कठीण होत हे मदतकार्य हे जाणुन घेतलंय आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *