Wed. Oct 5th, 2022

नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास सांगणारे वृक्ष कोसळले

गड आला पण सिंह गेला ” हे गौरोउद्गार छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वीर मावळ्यासाठी काढले ते नरवीर तानाजी मालुसरे यांची कर्मभुमी असलेल्या पोलादपुर तालुक्यातील उमरठ या गावी नरवीरांचा वाडा होता.  या वाड्या शेजारी उभे असलेले पुरातन असे आंब्याचे झाड नरवीरांच्या पराक्रमाची साक्ष देत उभे होते.  ते आंब्याचे झाड आज झालेल्या मुसळधार पावसामध्ये कोसळले आहे. या झाडाच्या डोलीमध्ये काही वर्षांपूर्वी शिवकालीन हत्यार देखील सापडली होती. त्यामुळे या झाडाला विषेश महत्व प्राप्त झाले होते. आंब्याचे झाड मुसळधार पावसाने जमीनदोस्त झाले आहे. या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही मात्र, काही प्रमाणात स्मारकाच्या तटबंदीचे नुकसान झाले आहे.

शिवकालीन इतिहास सांगणारे हे झाड उन्मळून पडले आहे.यामुळे, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाच्या परिसरात असलेली तटबंदी देखील तुटली आहे.दरम्यान, पोलादपूर येथील नरवीर रेस्क्यू टीम मार्फत हे झाड बाजूला करण्यात आले .सध्या राज्याच्या विविध ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नद्यांची पाणी चांगलीच वाढली आहे आणि यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास सांगणारे सुमारे साडेतीनशे वर्ष पुरातन वृक्ष कोसळले आहे. या झाडाचा इतिहास म्हणजे या आंब्याच्या ढोलीमध्ये मावळे हे तलवारी आणि हत्यारे लपवित असल्याची आख्यायिका सांगितली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.