पंतप्रधानांच्या नावाने अभियांत्रिकी कॉलेजच्या प्रिंसिपलला ‘असं’ Tweet

कोरोना व्हायरसने जगात हाहाःकार माजवला असून भारतातही कोरोनचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. राज्यात सर्व सिनेमागृह, जिम तसंच शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. असं असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एका प्रिंसिपलची Twitter वरील पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय ही अतिशय उत्तम शिक्षण संस्था असून कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आपले कॉलेज 30 दिवस बंद करावं या आशयाची कोरोनाची पोस्ट हॅशटॅग वापरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रिंसिपल अविनाश वानखेडे यांना अनुसरून केली.
त्या पोस्टवर ‘भाई नहीं हो पायेगा. सॉरी’ असा रिप्लाय प्रिंसिपॉल वानखेडे यांनी केलं आहे. पण पोस्टची शहानिशा केली असता ही पोस्ट फेक असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर ‘आपलं Twitter वर अकाउंट नाही आणि ही पोस्टही आपली नाही’, असा खुलासा प्रिंसिपल वानखेडे यांनी केला आहे.

देशाचे पंतप्रधान तसेच एका प्रिंसिपॉल यांची अशी थट्टा करणं कितपत योग्य आहे? त्यामुळे असे फेक अकाउंट बनवून अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे तरच असे प्रकार संपुष्टात येतील.