नारायण राणेंच्या आरोपामुळे नितेश राणे आणि शिवसेना अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची

ओरस येथे सुरु असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि जिल्हा नियोजनाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्यावर आरोप केले आहेत.
जिल्हा नियोजन निधी परस्पर विरोधी पक्षातून आलेल्या सरपंच, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमधील सदस्यांना परस्पर देण्यात येत असल्याचा आरोप नारायण राणे यांनी उदय सामंत यांच्यावर केला आहे. नारायण राणे यांनी केलेल्या आरोपामुळे भाजप नेते नितेश राणे आणि शिवसेना पक्ष अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
नारायण राणे यांनी केलेल्या आरोपांमुळे उदय सामंत यांनी शिवसेनेच्या सर्व सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच नियोजनाचा निधी कुठेही नियोजन समितीच्या सभेशिवाय दिला जात नसल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वर्तमानपत्रात आलेल्या बातमीचा पुरावा देत उदय सामंतवर आरोप केले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला असून नितेश राणे आणि शिवसेनेचे अधिकारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.