Sat. Oct 1st, 2022

PUBG गेम पार्टनरसाठी महिलेचा लाईफ पार्टनरला घटस्फोट

PUBG या गेममुळे तरुणाईला वेग लागले असून यामुळे अनेक लोकांचा जीवही गेला आहे. मात्र या गेमच्या लोकप्रियता वाढत असून या गेमपायी 19 वर्षीय विवाहित महिलेने घटस्फोटाची मागणी केली आहे. महिलेच्या या आगळ्या-वेगळ्या घटस्फोटाच्या कारणावरुन समुुदेशकांनाही मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

PUBG गेमच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे तरुण वर्गाला वेड लागले आहे.

या गेममुळे अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे.

तसेच पबजी खेळणाऱ्या मुलाशी प्रेम करत असल्यामुळे एका विवाहित महिलेने घटस्फोटाची मागणी केली आहे.

अहमदाबाद येथील बांधकाम कंत्राटदाराच्या पत्नीने घटस्फोटाची मागणी केली आहे.

19 वर्षीय या महिलेला एक मुलगी असून ती गेल्या अनेक महिन्यांपासून पबजी खेळत आहे.

हा खेळ खेळत असतानाच ही महिला एक तरुण मुलाच्या संपर्कात आली.

हा तरुण मुलासोबत महिला पबजी पार्टनर म्हणून गेम खेळत होती.

तरुणासोबत दररोज गेम खेळत असल्यामुळे आता त्याच्यासोबत राहायचे असल्याचे महिलेने म्हटलं आहे.

महिलेच्या घटस्फोटाचे कारण ऐकून समुुदेशकांनाही मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या महिलेने महिला हेल्पलाईनकडे घटस्फोटाची मागणी केली आहे.

तसेच तिच्या वडिलांनी या घटस्फोटासाठी विरोध केला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.