Thu. Jul 18th, 2019

टिळक रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकावरच बलात्कार

0Shares

राज्यात गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून बलात्कार सारख्या गंभीर घटनाही मोठ्या प्रमाणात घडत आहे. मुंबईच्या सायन येथील टिळक रुग्णालयात रुग्णाबरोबर देखरेखीसाठी आलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे.  आजारावर उपचार घेण्यासाठी रुग्ण महिला सायनच्या रुग्णालयात दाखल झाली होती. महिलेला मदत करण्यासाठी तिच्याबरोबर आलेल्या महिलेवर एका अज्ञात व्यक्तीने बलात्कार केल्याचे समजते आहे.

नेमकं काय घडलं ?

सायना येथील टिळक रुग्णालयात HIV आजारावर उपचार घेण्यासाठी महिला आली होती.

महिलेच्या देखरेखीसाठी तिच्यासोबत नातेवाईक महिला रुग्णालयात आली होती.

मात्र रुग्णालयातच तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

एक अनोळखी व्यक्तीने तिला मदत करण्याच्या बाहण्याने रुग्णालयाच्या ईमारतीच्या पाचव्या मजल्यावर घेऊन गेला.

ईमारतीच्या पाचव्या मजल्यावर पोहोचल्यावर व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला.

बलात्कार केल्यामुळे  महिलेने सायना पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.

हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून आरोपीला अटक करण्यात आले आहे.

मात्र टिळक रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *