Sun. Jun 20th, 2021

मंदिरात जाणाऱ्या महिलेचा भररस्त्यात विनयभंग

मंदिरात जाण्यासाठी निघालेल्या एका महिलेला भररस्त्यात अडवून विनयभंग करून जाब विचारायला गेलेल्या पतीला मारहाण झाल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे.

उल्हासनगर कॅम्प 4 येथील परिसरात राहणाऱ्या पीडित महिला शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मंदिरात जाण्यासाठी घराबाहेर पडली. दीपक दरबार रोडवर राहुल नावाच्या तरुणाने तिला अडवून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

हा संपूर्ण प्रकार पीडित महिलेने तिच्या पतीला घरी येऊन सांगितले.जाब विचारायला गेलेल्या पीडित महिलेच्या पतीलाच मारहाण झाल्याची घटना घडली आहे.

याविषयी ‘कायद्याने वागा’ संघटनेचे राज असरोंडकर, अमेय बाक्रे, स्वप्निल पाटील, नितीन महाजन, प्रफुल केदारे, राकेश पाटील यांच्या शिष्टमंडळाने पीडित महिलेसोबत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांची भेट घेऊन कारवाई करण्यासाठी निवेदन दिले आहे.

या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी राहुल नामक तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *