Wed. Jul 28th, 2021

महिला ट्राफिक पोलिसाच्या सर्तकतेमुळे आजोबांची पैशांची बॅग वाचली

कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडा परिसरात 60 वर्षीय आजोबांची पैशांची बॅग लंपास करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र महिला ट्राफिक पोलीसाच्या सर्तकतेमुळे बॅग घेऊन पलायन करणाऱ्या चोरट्याला पकडल्याने आजोबांना पैशांची बॅग पुन्हा मिळाली आहे.

नेमकं काय घडलं ?

बेतूरकर पाडा परिसरात 60 वर्षीय रामजी गुप्ता राहतात असून ते सेवा निवृत्त झाले आहेत.

पैशांची गरज असल्यामुळे गुप्ता यांनी बॅंकेमध्ये सेवा निवृत्तीचे जमा असलेली रक्कम काढण्यासाठी गेले होते.

गुप्ता यांना सेवा निवृत्त झाल्यानंतर 3 लाख रुपये मिळाले होते.

हीच रक्कम काढण्यासाठी गुप्ता बॅंकेत गेले होते.

बॅंकेतून पैसे काढल्यानंतर बॅंकेबाहेर पडताच त्यांच्यावर नजर असलेल्या चोरट्यांनी बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

एका अल्पवयीन चोरट्याने त्यांची बॅग हिसकावून घेतल्यानंतर पलायन केले.

मात्र गुप्ता यांनी या चोरांचा पाठलाग कराण्यास सुरुवात केली.

ही सर्व घटना ड्युटी बजावत असलेल्या महिला ट्राफिक पोलिसाच्या लक्षात आली.

चोरटा पळत असताना शोभा जाधव (महिला ट्राफिक पोलीस) यांनी चोरट्याचा पाठलाग केला आणि चोरट्याकडून बॅग घेण्यात यशस्वी ठरल्या.

शोभा जाधव यांच्या सर्तकतेमुळे 60 वर्षीय आजोबांची पैशांची बॅग पुन्हा त्यांना मिळाली.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *