Sat. Jul 31st, 2021

तरुणाला स्टंटबाजी पडली महागात; झाडावरून तळ्यात उडी मारताना घसरला पाय

पावसाळा सुरू असून पावसाचा आनंद लुटण्यासाठी अनेक जण धबधब्यावर किंवा तळ्यावर जाताना दिसतात. यावेळी उत्साहाच्या नादात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यातच जर स्टंटबाजी करणारे तरुणाई असेल तर समस्यांना सामोरे जावे लागते. असाच एक प्रकार रत्नागिरीत पोहण्यासाठी झाडावरुन तळ्यात उडी मारताना तरुणाचा पाय घसरला आणि फांदी तुटून जमिनीवर पडला.

नेमकं काय घडलं ?

पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक धबधब्यावर, तळ्यावर फिरण्यासाठी जातात.

यावेळी अनेक जण पोहण्यासाठी पाण्यात उतरतात.

मात्र रत्नागिरीतील तेली आळी येथील तलावात उडी मारण्यासाठी तरुणाई झाडावर चढून मग उडी मारत असल्याचे समोर आले आहे.

एक तरुण उत्साहाच्या नादात झाडावर चढला.

पावसाळा असल्यामुळे झाडावर शेवाळ आले होते.

मात्र उडी मारत असताना अचानक झाडाची फांदी तुटल्यामुळे तरुण झाडावरुन खाली पडला.

तरुण तळ्याच्या कठड्यावरच पडल्यामुळे तो बेशुद्ध झाला असल्याचे दिसत आहे.

मात्र अशा स्टंटबाजीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून स्टंटबाजी करु नये असे आवाहन वारंवार देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *