Sun. Jun 20th, 2021

‘मुंबई पुणे मुंबई-3’ या चित्रपटाचं रहस्य उलगडलं

मुंबई पुणे मुंबई-3 येत्या 7 डिसेंबरला रिलीज होतोय. पहिल्या 2 भागात गाजवलेली स्वप्नील-मुक्ताची जादू पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे.

स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे हे अभिनयातील ‘हुकमी एक्के’ 8 वर्षांपूर्वी ‘मुंबई पुणे मुंबई’ या चित्रपटासह सुपरडूपर हिट ठरली आहे. आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुपरडूपर हिट ठरला. ही जोडी आणि चित्रपट इतका लोकप्रिय झाला आहे की त्या चित्रपटाच्या पुढच्या भागासाठी प्रक्षेक आतुरतेने वाट बघत होते. त्यानंतर या चित्रपटाचा पुढचा भाग ‘मुंबई पुणे मुंबई-२’ हा तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला. त्या चित्रपटालाही प्रेक्षकांनी तितकाच प्रतिसाद दिला.

‘मुंबई पुणे मुंबई’चा तिसरा भाग प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातलं रहस्य ‘पिंजरा’ या १९७२ मध्ये आलेल्या अजरामर चित्रपटातील “कुन्या गावाची, कोनच्या नावाची, कुन्या राजाची गं तू रानी…” हे गाजलेले गीत आता उलगडलं आहे.

हे गीत या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. या गाण्यात दोघांनीही फुल2धमाल केली आहे. ‘गं साजणी’ या गाण्याचे पुनरुत्थान केलं गेलं असून त्याला राम कदम, अविनाश-विश्वजीत यांचे संगीत आहे तर आदर्श शिंदे यांचा आवाज आहे. मूळ गाणं जगदीश खेबुडकर यांचं असून त्यात विश्वजित जोशी यांनी भर घातली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *