Sat. Oct 1st, 2022

Delhi Exit Poll 2020 : विविध एक्झिट पोलनुसार पुन्हा दिल्ली ‘आपलीच’

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. विविध संस्थांच्या पोलनुसार (Delhi Exit Poll) दिल्लीत पुन्हा आपचीच सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मतदानानंतर अनेक समूहांच्या एक्झिट पोलनुसार आप पक्षाने भाजपला मागे टाकलं आहे.  तर या ओपिनयन पोलमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही.

इंडिया न्यूजचा एक्झिट पोल

इंडिया न्यूजच्या एक्झिट पोलनुसार आपला ५३-५७ उमेदवार विजयी होऊ शकतात. तर भाजपला ११-१७ ठिकाणी विजयी होऊ शकतो. काँग्रेसचेही २ उमेदवार जिंकण्याची शक्यता या इंडिया न्यूजच्या पोलनुसार सांगितले जात आहे.

रिपब्लिक एक्झिट पोल

रिपब्लिकच्या एक्झिट पोलनुसार आम आदमी पक्षाला ४८-६१ जागा मिळू शकतात. भाजपला ९-२१ उमेदवार विजयी होऊ शकतात. तर काँग्रेसला १ जागा मिळण्याची शक्यता आहे.

टाईम्स  नाऊ

टाईम्स नाऊच्या एक्झिट पोलनुसार आपला ४४, भाजपला २६ जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सी व्होटर

सी व्होटरनुसार आप पक्षाचा ५५ तर भाजपचा १५ आणि काँग्रेसचा २ जागांवर विजय होऊ शकतो.

दिल्लीतील सत्तास्थापनेसाठीची आकडेवारी

दिल्लीत एकूण ७० विधानसभा मतदारसंघ आहेत. दिल्लीत सत्तास्थापनेसाठी संबंधित पक्षाचे ३६ उमेदवार जिंकून येणं आवश्यक आहे.

दिल्लीत २०१५ च्या निवडणुकीत आपचे ६७ तर भाजपच्या ३ उमेदवारांचा विजय झाला होता.

विद्यमान दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २२ फेब्रुवारीला समाप्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.