आमिर खानचा मुलगा जुनैदची बॉलिवूडमध्ये एंट्री

अभिनेता आमिर खानला त्याच्या कामासाठी बॉलिवूडमध्ये ओळखतात. बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किडने एंट्री केली आहे. तर सहाजिकच आहे की आमिर खान यात मागे कसे राहणार आता आमिर खानचा मुलगा जुनैद खानने बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे. महाराजा या चित्रपटाद्वारे तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. महाराजा या चित्रपटाचे चित्रीकरण हे महाराष्ट्रात होत असल्याचं म्हटलं जात आहे. महाराष्ट्र सरकारने कोरोनाचे सगळे नियम पाळून चित्रीकरणास पुन्हा परवानगी दिली आहे. त्यामुळे मुंबईतील मरोळ भागात बायो बबल पद्धतीने या चित्रपटाचे चित्रीकरण होणार असल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट यश राज फिल्म बॅनरचा असून या चित्रपटात जुनैदसोबतच शालिनी पांडे, जयदीप हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. या चित्रपटाच्या टीमच्या सगळ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून कोरोना लसीचा पहिला डोस देखील संपूर्ण टीमला देण्यात आलेला आहे. तसेच गेल्या काही वर्षांत जुनैदमध्ये खूपच बदल झाला आहे. त्याच्या या ट्रान्सर्फोमेशनची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.