Sun. Sep 15th, 2019

समलिंगी संबंधांतून झाली दिल्लीतील ‘या’ नेत्याची हत्या!

0Shares

आम आदमी पार्टीचे दिल्ली येथील नेते नवीन दास यांच्या हत्येचा तपास केल्यावर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. नवीन दास यांची हत्या समलिंगी संबंधांमुळे झाली असल्याचा खुलासा गाझियाबाद पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन केला.

 

अटक केलेल्या व्यक्तींची नावं तैय्यब, तालिब आणि समर खान अशी आहेत. यांपैकी तैय्यबचे नवीन दास यांच्याशी समलैंगिक संबंध असल्याचं चौकशीतून पुढे आलं आहे.

 

naveen_das1.jpg

 

दोघे करत दिल्लीमध्ये गे पार्ट्यांचं आयोजन

 

नवीन आणि तैय्यब यांची ओळख दीड वर्षांपूर्वी एका गे पार्टीत झाली होती.

यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली.

ते अनेक ठिकाणी फिरायला जात.

दिल्लीमध्येच ते गे पार्ट्यांचं आयोजनही करत.

या पार्टीत सहभागी होण्यासाठी लोकांकडून बक्कळ पैसेही घेत.

 

म्हणून केली हत्या…

 

मागील काही काळापासून नवीन तैय्यबसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी दबाव आणत होते.

नवीन यांनी दिल्लीतील छतरपूरमध्ये घेतलेल्या फ्लॅटमध्ये तैय्यबसोबत राहाण्याची नवीन यांची योजना होती.

नवीन याला तयार न झाल्यास दोघांच्या नात्याबद्दल तैय्यबच्या घरच्यांसमोर गौप्यस्फोट करण्याची धमकीही त्यांनी दिली होती.

burnt.jpg

 

भावांच्या मदतीने अशी केली हत्या

 

धमकीमुळे तैय्यबने नवीन यांच्या हत्येचा कट रचला.  

4 ऑक्टोबरला त्याने रात्री 11 वाजता नवीन यांना लोनी-भोपुरा रोडवर बोलावले.

येथे नवीन यांना हलव्यामधून नशेचा पदार्थ खाऊ घातला.

नशेतच त्यांच्याकडून त्यांचा एटीएम पिन तसंच नेटबॅंकिंगची गोपनीय माहिती घेतली.

यानंतर त्यांच्या खात्यातून 7 लाखांची रक्कम काढली.

त्यातील 5 लाख आपल्या बँक खात्यात ट्रान्सफर केले.

यानंतर नवीन यांना गाडीच्या पुढच्या सीटवर बसवून गाडीची नंबर प्लेट काढून पेट्रोल टाकून गाडी जाळली.

या हत्येनंतर तिघंही फरार झाले होते.

 

पोलिसांनी शोध घेऊन तिघांना अटक केली. त्यांच्याकडून 4 लाख 85 हजार रुपये, नवीन यांचा आयफोन, अन्य कागदपत्रे आणि 3 मोबाईल आदी सामान जप्त करण्यात आले आहे. 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *