अभिनेता राहुल रॉय यांची प्रकृती स्थिर
अभिनेता राहुल रॉय ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्यामुळे शरीराच्या उजव्या बाजूच्या भागावर परिणाम झाला आहे.

रूग्णालयाची माहिती मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयातील न्यूरोलॉजी सल्लागार डॉ. पवन पै यांनी सांगितले की, ‘‘वॉक्हार्ट रूग्णालयात वैद्यकीय तपासणीत असे आढळून आले की, अभिनेता राहुल रॉय यांना मोटर अफलिया (बोलण्यास अडचणी जाणवणे) आणि ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्यामुळे शरीराच्या उजव्या बाजूला त्याचा परिणाम झाला होता. एमआरआय चाचणीत मागील एमआरआयच्या तुलनेत कोणताही बदल दिसून आला नाही.
एमआरआय चाचणीत मेंदूच्या उजव्या धमणीत स्ट्रोक दर्शविण्यात आला होता. याशिवाय रॉय यांच्या हृदयाचे ठोकेही कमी झाले होते. म्हणूनच त्यांना एक दिवस अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना सर्वसाधारण वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. याशिवाय रॉय यांना स्पीच थेरपी आणि फिजिओथेरपी दिली जात आहेत. तसेच रक्त पातळ करण्यासाठी इंजेक्शन आणि औषधोपचार दिले जात आहे. सलग २१ दिवस हे सुरू राहिल.’’