Fri. Mar 5th, 2021

ज्यांनी निवडणूक लढवली नाही त्यांनी EVM वर बोलूच नये – आशिष शेलार

निवडणुका बॅलेटवर घ्याव्यात की ईव्हीएम मशीनद्वारे घ्याव्यात हे ठरवण्याचा घटनात्मक अधिकार निवडणूक आयोगाला असून ते त्यांनी ठरवायचं अशी प्रतिक्रीया मंत्री अँड. आशिष शेलार यांनी दिली आहे.

निवडणुका बॅलेटवर घ्याव्यात की ईव्हीएम मशीनद्वारे घ्याव्यात हे ठरवण्याचा घटनात्मक अधिकार निवडणूक आयोगाला असून ते त्यांनी ठरवायचं अशी प्रतिक्रीया मंत्री अँड. आशिष शेलार यांनी दिली आहे.

विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएमवर विरोध दर्शवला आहे. या पत्रकार परिषदेनंतर आशिष शेलार यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. ज्यांनी निवडणुक लढवली नाही त्यांनी तर यावर बोलूच नये असा टोला नाव न घेता राज ठाकरेंना लगावला आहे.

विरोधकांच्या पत्रकार परिषदेवर आशिष शेलार यांची प्रतिक्रीया

निवडणूक आयोगाला घटनात्मक अधिकार असून त्यांनी ठरवायचे आहे की, निवडणुका बॅलेटवर घ्याव्यात की ईव्हीएम मशीनद्वारे घ्याव्यात.

घटनात्मक अधिकार असलेल्या आयोगावर अशाप्रकारे जनमानसात संभ्रम निर्माण करणे हे अत्यंत चुकीचे आहे.

आज पत्रकार परिषद घेऊन जे नेते ईव्हीएमच्या विरोधात बोलत आहेत त्यापैकी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे ईव्हीएम द्वारेच निवडून आले आहेत. त्यांनी आधी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मगच ईव्हीएम बाबत बोलावे.

या पत्रकार परिषदेतील काही नेते ईव्हीएम बाबत बोलत आहेत त्यांनी कधीच निवडणूक लढवलेली नाही. ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही त्यांनी आधी निवडणूक लढवून दाखवावी आणि मगच ईव्हीएम बाबत बोलावे

जेव्हा हे सगळे निवडून येतात तेव्हा ईव्हीएम चांगले आणि पराभव झाला की ईव्हीएम वर खापर फोडायचे. हा प्रकार म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असा आहे.

जनतेने जो कौल दिला आहे त्याचाही हे अपमान करीत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिलेल्या सल्याप्रमाणे या सर्वांनी आत्मचिंतन करायची खरंच गरज आहे.

जे कधी घराच्या बाहेर नाही पडले ते आता कोलकात्यापासून लोकांच्या फ्लॅटवर जात आहेत. अशी टीका केली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *