Tue. Mar 2nd, 2021

अब्दुल सत्तार यांचा उमेदवारी अर्ज मागे!

लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांनी आपला अर्ज अखेर मागे घेतला आहे. औरंगाबादमध्ये दलित तसंच मुस्लिम मतांचं विभाजन टाळण्यासाठी आपण माघार घेतली असल्याचं सत्तार यांनी म्हटलं आहे.  गेल्या ३६ वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या सत्तारांनी बंडखोरी केल्यानं मोठी खळबळ उडाली होती.

 

नाराज अब्दुल सत्तारांची अखेर माघार

काँग्रेस नेते अब्दुल सत्तार यांना तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते.

दरम्यान त्यांनी दोन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही दोनवेळा भेट घेतली.

त्यामुळे अब्दुल सत्तार BJPमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती.

मात्र तसं न होता सत्तार यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

औरंगाबादमध्ये आधीच युतीचे खासदार चंद्रकांत खैरे, MIM चे आमदार आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाझ जलील आणि काँग्रेसचे सुभाष झांबड यांच्यात लोकसभेसाठी सामना होत आहे.

अशात अपक्ष उमेदवार म्हणून अब्दुल सत्तार यांनी अर्ज दाखल केला.

त्यामुळे दलित आणि मुस्लिम मतांचं विभाजन होण्याची शक्यता निर्माण झाली.

हेच विभाजन टाळण्यासाठी आपण आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचं सत्तार यांनी म्हटलंय.

सत्तार हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात.

आता औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात काँग्रेस किंवा भाजपला पाठींबा देणार नाही. किंवा त्या दोन्ही पक्षात जाणार नाही, असे स्पष्टपाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *