Sat. Apr 4th, 2020

अब्दुल सत्तार यांच्या राज्यमंत्रीपदाचा राजीनामा

ठाकरे सरकारला खातेवाटपापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप जाहीर होण्यापूर्वीच महाआघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. मात्र शिवसेनेचे (Shivsena) मंत्री अनिल देसाई यांनी मात्र अब्दुल सत्तारांनी राजीनामा न दिल्याचं म्हटलं आहे.

महाआघाडीतील राजीनामानाट्य

अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

यापूर्वी काँग्रेसमध्ये (Congress) असणारे सत्तार आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत आले होते.

औरंगाबादमधील सिल्लोड मतदारसंघातून ते विजयी झाले होते.

सत्तार यांची समजूत काढण्यासाठी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर प्रयत्न करत होते.

मात्र या सगळ्या प्रकारानंतर सत्तार यांनी राजीनामा दिलेला नाही, असं अनिल देसाई यांनी म्हटलं आहे. आपल्याकडे अजूनही राजीनामा आलेला नाही, असं ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *