Tue. Oct 26th, 2021

अभी तो मै जवान हू – शरद पवार

विधानसभा निवडणुका काही दिवसांवर असून राजकीय पक्षांनी प्रचार सभा घेण्यात सुरुवात केली आहे. कोल्हापूर येथील राधानगरीचे उमेदवार के पी पाटील यांच्या प्रचारसभेत बोलताना शरद पवारांनी महायुतीवर जोरदार टीका केली आहे. यावेळी शरद पवार आक्रमक झाले होते. त्याचबरोबर माझे वय झाले नसून अभी तो मै जवान हू असे शरद पवारांनी म्हटलं आहे. सेना भाजपाचे सरकार घालवल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचेही पवार म्हणाले.

काय म्हणाले शरद पवार ?

कॉंग्रेसच्या आमदार सतेज पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष के पी पाटील यांनी भाषणावेळी म्हटलं होतं.

त्यावर बोलताना अभी तो मै जवान हू असे शरद पवारांनी उत्तर दिले.

ईडी प्रकरण आणि अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार शांत होतील असे वाटत असताना युतीची सरकार घालवल्याशिवाय गप्प बसणार नाही असे म्हणाले.

त्यामुळे पवारांचा आत्मविश्वास पुन्हा एकदा पाहायला मिळाला असून त्यांची भाषणाची खास शैलीही दिसून आली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *