“ठणठणीत बरे झाल्यावर अभिनंदन पुन्हा कामावर रुजू” – भारतीय दल प्रमुख

पाकिस्तानचे तीन विमानं भारतीय हद्दीत घुसल्यामुळे त्यांना प्रत्युत्तर देत असताना भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे विमान कोसळले. यावेळी अभिनंदन पाकिस्तान हद्दीत उतरले आणि पाकिस्तानने त्यांच्या ताब्यात घेतले. अभिनंदन यांना पाकिस्तानच्या नागरिकांनी प्रचंड मारहाण केल्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर नव्हती. सध्या त्यांच्यावर रुग्णलयात उपचार सुरू असून ते ठणठणीत बरे झाल्यानंतर ते पुन्हा जेट विमान उडवू शकतील असे भारतीय हवाई दलाचे प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ यांनी सांगितले आहे.
काय म्हणाले भारतीय हवाई दलाचे प्रमुख ?
भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची सध्या आरोग्य चाचण्या सुरू आहेत.
त्यांना आणखी उपचाराची आवश्यकता असेल तर त्यांच्यावर उपचार करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले आहे.
जेव्हा ते पूर्णपणे ठणठणीत होतील ते पुन्हा कामावर रुजू होतील.
अभिनंदन यांच्यावर दिल्लीतील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते.
नेमकं काय घडलं ?
पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने बालाकोटमधील दशतवादी तळांना उद्धवस्त केले.
या हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानचे काही विमानं भारतीय हद्दीत घुसली.
या पाकिस्तानी विमानांना प्रतिकार करताना अभिनंदन यांचे विमान पाकिस्तान हद्दीत कोसळले.
अभिनंदन पाकिस्तान हद्दीत उतरल्यामुळे ते तीन दिवस पाकिस्तानच्या ताब्यात होते.
भारताने पाकिस्तानकडे अभिनंदनला सुरक्षित परत करण्याची मागणी केल्यानंतर.
अभिनंदन यांना १ मार्च रोजी भारताकडे सोपवण्यात आले.