Mon. Nov 18th, 2019

‘मौका मौका’ला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकने केला ‘यांचा’ अपमान

World Cup 2019 ला सुरुवात झाली असून भारत दोन सामन्यात विजयी ठरला आहे. भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिका आणि दुसरा सामना ऑस्ट्रेलियासोबत पार पडला. मात्र सर्वात जास्त उत्सुक असलेला सामना अर्थात भारत आणि पाकिस्तान हा 16 जून रोजी पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानने भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची खिल्ली उडवत एक जाहिरात तयार केली आहे.

नेमकी जाहिरात काय ?

16 जून रोजी भारत- पाकिस्तान असा सामना लंडनच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर रंगणार आहे.

या सामन्यापूर्वी पाकिस्तानने एक जाहिरात तयार करत भारतीय हवाई दलाचा अपमान केला आहे.

पाकिस्तानने चक्क जाहिरातीत भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांचा अभिनय करून अपमान केल्याचे समजते आहे.

या जाहिरातीच्या माध्यमातून अभिनंदन यांच्या शौर्याची खिल्ली उडवली आहे.

त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये संतापाचे वातावरण दिसत आहे.

फादर्स डे निमित्त भारताकडून ‘मौका- मौका’ –

2015 साली झालेल्या भारत-पाक सामन्याच्या निमित्ताने Star Sportsने मौका मौका ही जाहिरात प्रदर्शित केली होती.

ही जाहिरात त्यावेळी प्रचंड गाजली होती.

यंदाही Star Sportsने मौका मौकाची नवीन जाहिरात तयार केली आहे.

यामध्ये फादर्स डे निमित्त बाप जाहिरातीने पाकिस्तानला चिडवण्यात आले आहे.

त्यामुळे पाकिस्तानला चांगलाच सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

याच जाहिरातीला पाकिस्तानने प्रत्युत्तर दिले आहे.

नेमकं ‘या’ व्हिडीओत आहे तरी काय ?

पाकिस्तानने World Cup 2019च्या सामन्यापूर्वी भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांचा अभिनय करत  नवा व्हिडीओ तयार करण्यात आला.

हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानकडून जेव्हा अटक करण्यात आले तेव्हा काही प्रश्न विचारण्यात आले होते.

मात्र ‘मी तुम्हाला उत्तर देण्यास बांधिल नाही’, असं अभिनंदन यांनी सांगितले होतं.

यासंदर्भात व्हिडीओ देखील पाकिस्तानकडून शेअर करण्यात आला होता.

यावर आधारीत व्हिडीओ बनवून पाकिस्तानकडून हा व्हिडीओ Pakistan’s Jazz TV ने रिलीज केलाय.

मात्र हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांच्या शौर्याचा पाकिस्तानने अपमान केल्याचा आरोप भारतीयांकडून करण्यात आला.

हा व्हिडीओ तयार करून पाकिस्तानने अत्यंत खालच्या पातळीचा प्रकार केल्याने त्यांच्यावर टीका करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *