Mon. Dec 6th, 2021

अभिनंदन यांच्या ‘मिशांची स्टाइल’ राष्ट्रीय मिशा घोषित करा – कॉंग्रेस नेते

17व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला 17 तारखेपासून सुरूवात झाली आहे. अधिवेशन सुरू असताना भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात यावा अशी मागणी कॉंग्रेसचे लोकसभेचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे.

काय आहे मागणी ?

17 तारखेपासून अधिवेशनाला सुरूवात झाली आहे.

कॉंग्रेसचे लोकसभेचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी एक मागणी केली आहे.

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली आहे.

त्याचबरोबर अभिनंदन यांच्या मिशांची स्टाइल राष्ट्रीय मिशा असे घोषित करावी अशीही मागणी केली आहे.

अधीर रंजन चौधरी यांनी भाजपा आणि मोदी सरकारवर घणाघाती टीकाही केली आहे.

कोण आहे अभिनंदन ?

14 फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलावामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक केले.

पाकिस्तान येथील बालकोटमध्ये हा एअर स्ट्राइक करण्यात आला.

मात्र हा हल्ला केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानचे काही लढाऊ विमान भारतीय हद्दीत घुसखोरी करत होते.

विमानांना पळवून लावताना भारतीय हवाई दलाचा विंग कमांडकर अभिनंदन वर्धमान यांचे मिग-२१ विमान कोसळले.

यावेळी ते पाकिस्तान हद्दीत त्यांचे पॅराशूट उतरले आणि पाकिस्तान सैन्याने त्यांना आपल्या ताब्यात घेतले.

दोन दिवस पाकिस्तानच्या ताब्यात राहिल्यानंतर त्यांना सुखरूप भारतात आणले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *